खुलताबाद, (प्रतिनिधी): वेरूळ येथील बारावी ज्योतिर्लिंग श्री घृष्णेश्वर मंदिर व लेणी परिसरातील अतिक्रमणे काढण्याची सुरुवात आज प्रशासनाने केली. जगप्रसिद्ध वेरूळ येथील कैलास लेण्या व श्री घृष्णेश्वर मंदिर परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झाले असून यामुळे ही ऐतिहासिक व धार्मिक स्थळे अतिक्रमणाच्या विळख्यात सापडली आहेत.
पुढील कुंभमेळ्या दरम्यान या परिसरामध्ये हजारो भाविक व पर्यटक येणार असल्याने त्यांची गैरसोय टाळण्यासाठी प्रशासनाने तयारी सुरू केली असून पहिल्या टप्प्यामध्ये ही सर्व अतिक्रमणे काढण्यात येणार आहेत. यानंतर या परिसरामध्ये भाविक पर्यटकांसाठी विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
याप्रसंगी पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
मांडुळ सापाचे दर्शन मंदिर परिसरातील अतिक्रमणे काढताना दुर्मिळ मांडूळ जातीचा साप आढळून आला.
या सापाला सुरक्षितपणे पकडून त्याला पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांच्या सूचनेनुसार वनविभागाच्या स्वाधीन करण्यात आले. यानंतर वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी सदरील मांडूळाला सुरक्षित ओळख क्षेत्रात सोडून दिले.














